नोटाबंदीनंतर 'क्लीन मनी' कारवाई, 9,334 कोटींचे उत्पन्न जप्त

नोटाबंदीच्या निर्णयानंतर नऊ नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी या काळात केंद्रीय आयकर विभागानं 9 हजार 334 कोटी रुपयाचं अघोषित उत्पन्न पकडले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 14, 2017, 02:38 PM IST
नोटाबंदीनंतर 'क्लीन मनी' कारवाई, 9,334 कोटींचे उत्पन्न जप्त title=

नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयानंतर नऊ नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी या काळात केंद्रीय आयकर विभागानं 9 हजार 334 कोटी रुपयाचं अघोषित उत्पन्न पकडले आहे.

ऑपरेशन 'क्लीन मनी'अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. आजपासून ऑपरेशन 'क्लीन मनी'चा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. त्यात 60 हजार नागरिकांच्या संशयास्पद व्यवहारांची चौकशी होणार आहे.

या 60 हजार नागरिकांपैकी तेराशे खाती जोखमीची असल्याचे आयकर विभागानं म्हटले आहे. त्याचप्रमाणे नोटाबंदीच्या काळातले 6 हजार मालमत्ता व्यवहार आयकर विभागाच्या चौकाशीच्या फेऱ्यात सापडणार आहेत.

ऑपरेशन 'क्लिन मनी'च्या पहिल्या टप्प्यातील कारवाई 31 जानेवारीला पार पडली. या कारवाईदरम्यान आयकर विभागाने एकूण 17.92 लाख लोकांची चौकशी केली. यामधील 9.46 लाख लोकांची चौकशी आयकर विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली.