लाल किल्ला, नवी दिल्ली : देशाचा ६९ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी दिल्लीचा लाल किल्ला सज्ज झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी झेंडा वंदन करुन देशाला संबोधत आहेत. त्यांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे
२०२२ मध्ये प्रत्येकाला घर असेल, नोकरी असेल, एकही माणूस उपाशी नसेल. २०२२ पर्यंत देशात कोणीही गरीब राहणार नाही. लहान सरकारी नोकरीसाठी मुलाखत गरजेची नाही. ज्या नोकऱ्यांमध्ये विशेष प्रावीण्य लागत नाही अशा छोट्या छोट्या नोकऱ्यांसाठी मुलाखती बंद करा. मेरीटच्या आधारावर ऑनलाइन नोकऱ्या द्याव्यात, असा माझा राज्यांना आग्रह आहे. काही होणार नाही, याबातची परिस्थिती बदलत आहे. स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया हा आपला मानस असायला हवा. हा मोदींचा नवा नारा आहे.
। सकाळी ८.४८ वाजता
जे उद्योग जास्त रोजगार देतील. त्या उद्योगांना विशेष आर्थिक येजना आखण्यात येईल.
। सकाळी ८.४६ वाजता
बँकांच्या लोकांकडून मला खूप अपेक्षा आहे. हे वर्ष डॉ. आंबेडकरांचं सव्वाशे वर्ष जयंतीचं आहे. जिथे आदिवासी, दलित आहेत प्रत्येक शाखा एका दलिताला किंवा आदिवासीला स्टार्ट अप कर्ज द्यावं. सव्वा लाख उद्योजक तयार होतील. तसंच महिलांना संधी द्यावी. यामुळे प्रचंड बदल घडेल.
। सकाळी ८.४५ वाजता
स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडियाचा नारा. स्टार्ट अपच्या युगात आपण जगात एक नंबर आपण बनू शकतो. स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया, हा आपला मानस असायला हवा.
। सकाळी ८.४० वाजता
१२५ कोटी टीम इंडिया संकल्प करु या, १८,५०० गावांमध्ये १००० दिवसांत वीज पोहोचवू या. आजही १८,५०० गावांमध्ये वीजेचे खांब नाहीत. जर जुन्या पद्धतीने गेलो तर १० वर्ष लागतील. १००० दिवसांमध्ये १८,५०० गावांमध्ये वीजेचे खांब पोचवण्याचा विडा आपण उचलूया
। सकाळी ८.३९ वाजता
जेवढं महत्त्व कृषि विकासाला आहे तेवढंच शेतकरी कल्याणाला महत्त्व आहे. आता कृषि खाते हे कृषि व किसान कल्याण मंत्रालय म्हणून ओळखलं जाईल. सरकार केवळ शेती नाही तर शेतक-यांसाठी स्थायी व्यवस्था करणार
। सकाळी ८.३७ वाजता
बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम, ईशान्येची राज्ये विकासासाठी महत्त्वाची आहे. त्यासाठी आम्ही गॅसची पाइपलाइन टाकण्याचा प्रयत्न आहे. चार युरिया खताचे कारखाने पूर्वेकडील राज्यात जे बंद पडले होते ते सुरू करण्याच्या दिशेने काम सुरू आहे.
। सकाळी ८.३५ वाजता
शेतीचं नुकसान ५० टक्के असेल तर भरपाई मिळायची आम्ही हीमर्यादा ३० टक्क्यांवर आणली. जे काम ६० वर्षात झालं नाही ते आम्ही केलं. शेतक-यांसाठी सिंचनासाठी ५० हजार कोटी रुपये खर्च करण्याचा आमचा मानस आहे. पर ड्रॉप मोअर क्रॉप या दिशेने आम्ही पुढे जात आहोत.
। सकाळी ८.३१ वाजता
आम्ही येण्यापूर्वी महागाई १० टक्क्यांपेक्षा जास्त होती. ती महागाई कमी केली. ती ३ - ४ टक्क्यांच्या जवळपास आणली.
। सकाळी ८.३० वाजता
मनी लाँडरिग अॅक्टअंतर्गत झालेल्या दाव्यांमध्ये दहा वर्षांत १० हजार कोटी रुपयांची प्रकरणे बाहेर आली. त्यातली ४५०० कोटी रुपयांची प्रकरणे गेल्या १० महिन्यातली आहेत, यावरून आमचा संकल्प दिसतो.
। सकाळी ८.२९ वाजता
आम्ही सत्तेत येण्यापूर्वी ८०० भ्रष्टाचाराच्या केसेस होत्या. आम्ही आल्यावर ही संख्या १८०० झाली आहे. यावरून भ्रष्टाचाराच्या कमी केलाय. यावरून आमची मानसिकता दिसत आहे.
। सकाळी ८.२२ वाजता
आता काळा पैसा बाहेर जाणार नाही. काळा पैसा माफी योजनेनंतर सुमारे ६५०० कोटी रुपये तिजोरीत यायला लागलाय. काळ्या पैशांसंदर्भात जे काम तीन वर्षे झालं नाही ते आम्ही एका आठवड्यात केलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाखाली समिती नेमली.
। सकाळी ८.२० वाजता
भ्रष्टाचारमुक्त भारत मी करून दाखवणार. हे काम सोपं नाहीये. ती वाळवी आहे. पण आपण हे काम करू.
। सकाळी ८.१५ वाजता
एफएम रेडियोचा लिलाव करु नका यासाठी माझ्यावर खूप दबाव टाकण्यात आला. मी म्हटलं , लिलाव होणार नाही. ८०- ८२ शहरात लिलाव सुरू आहे आणि हजार कोटींच्या पुढे लिलावाची रक्कम आत्ताच गेली आहे. ही रक्कम गरीबांच्याच कामाला येईल.
। सकाळी ८.१४ वाजता
कोळसा खाणींचा लिलाव केला तेव्हा तीन लाख कोटींनी तिजोरी भरेल हे कळलं. हे आम्ही भाषण नाही केलं, करून दाखवलं.
। सकाळी ८.१३वाजता
मध्यमवर्गाच्या लोकांनी गॅस सबसिडी परत केली. गरीबांच्या कडे या सबसिडीचा लाभ होईल त्यांच्या घरी चूल पेटेल याचा विचार करा.
। सकाळी ८.१२ वाजता
थेट सबसिडी देण्याच्या योजनेमुळे दलाली बंद झाली, मोठ्या मोठ्या घोषणा केल्या नाहीत. आज मी सांगू इच्छितो की यामुळे जवळपास १५ हजार कोटी रुपये जे चोरी होत होते ते बंद झाले. भ्रष्टाचार बंद झाला.
। सकाळी ८.११ वाजता
मी १५ हजार कोटींची सबसिडी बंद केली असती तर कौतुकाचा वर्षाव झाला असता, की हा माणूस दमदार आहे. मी सबसिडी बंद केली नाही तर लोक म्हणतील मोदीमध्ये काही फारसा दम नाही. आम्ही LPG सबसिडी थेट बँक खात्यात जमा करण्याची योजना आणली.
। सकाळी ८.१० वाजता
भ्रष्टाचार हा वाळवीसारखा पसरलाय. पण आपण भ्रष्टाचारमुक्त होऊ शकतो. या देशाला पण भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी कोट्यवधी उपायांची गरज आहे.
। सकाळी ८.०८ वाजता
भ्रष्टाचार ही मोठी समस्या आहे. आजारी व्यक्ती निरोगी कसं व्हायचं याचा सल्ला सगळे देतात. हीच अवस्था भ्रष्टाचाराची आहे. सगळे एकमेकांना भ्रष्टाचाराबद्दल सल्ले देत आहेत. हा भ्रष्टाचार नष्ट करायचा आहे.
। सकाळी ८.०७ वाजता
कायदे काळाप्रमाणे असायला हवेत, सोपे असावेत, सुटसुटीत असायला हवे. असे कायदे सुटसुटीत करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
। सकाळी ८.०४ वाजता
असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना ओळखपत्र देण्याचा कार्यक्रम हाती घेतलाय. ज्यामुळे त्यांना विविध लाभ होतील. या क्षेत्रातल्या लोकांनी सरकारी तिजोरीत २७ हजार कोटी रुपये जमा केले. तसेच २७ हजार कोटी रुपये गरीबांना परत करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
। सकाळी ८.०३ वाजता
सुटाबुटातल्या लोकांना आपण नमस्कार करतो, परंतु दुध विकणारा, वर्तमान पत्र विकणारा, रिक्षावाला याकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन ठिक नाही. श्रमाचे महत्त्व, श्रमिकांचा गौरव हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य हवं, आपला स्वभाव असायला हवा, ही आपली वृत्ती असायला हवी.
। सकाळी ८.०० वाजता
गेल्या वर्षी माझ्या मनात आले ते मी सांगितलं की शाळांमध्ये मुलींसाठी आणि मुलांसाठी वेगळी शौचालय हवेत. तेव्हा कळले की सव्वा दोन लाख शाळांमध्ये चार लाखांपेक्षा जास्त शौचालयांची गरज आहे. टीम इंडियाचं अभिनंदन.. त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. जवळपास हे लक्ष्य आपण हे पूर्ण केलं. राज्य सरकार, शिक्षण क्षेत्र अशा सगळ्यांचं अभिनंदन. मुद्दा सव्वा चार लाख शौचालयं बांधण्याचा नाही तर हे काम आम्ही करू शकतो, टीम इंडिया सफल होई शकते या आत्मविश्वास निर्माण होण्याचा आहे.
। सकाळी ७.५८ वाजता
स्वच्छतेचा सगळ्यात मोठा ब्रँड अँबॅसॅडर कोण आहे याचा विचार केला तर लक्षात येईल की लहान लहान मुलांनी स्वच्छ भारत अभियानात भाग घेतला नी मोठ्यांना सांगितले, घाण करु नका. अशा करोडो लहान मुलांना नमन. ज्या देशाचा बालक स्वच्छतेसाठी कटीबद्ध असेल तो देश स्वच्छ होणारच होणार.
। सकाळी ७.५६ वाजता
गेल्या वर्षी मी शौचालय, स्वच्छतेविषयी बोललो. देशाला आश्चर्य वाटलं. लाल किल्यावर शौचालयामध्ये वेळ फुकट घालवतात. पण कुठल्याही पाहाणीत आढळलंय की स्वच्छतेचं अभियान सगळ्यात महत्त्वाचं ठरलंय. टीम इंडिया, सेलिब्रिटी, अध्यात्मिक लोक, प्रसारमाध्यमं अशा सगळ्यांनी स्वच्छतेचं व्रत घेतले, त्यांचे प्रेमाने अभिनंदन.
। सकाळी ७.५५ वाजता
योजना कुठली, सरकार करत नाही. सगळे करतात, फिती कोण नाही कापत, सगळे कापतात. नव्या योजनांच्या घोषणा कोण करतं की नाही. सगळी सरकार करतात. महत्त्वाचं हे आहे की, कुठल्या घोषणा वास्तवात उतरतात. आमच्या योजनांमध्ये १०० दिवसांमध्ये १० कोटी लोकांनी सहभाग घेतला हे वैशिष्ट्य आहे. हे टीम इंडियाचं यश आहे.
। सकाळी ७. ५४ वाजता
अटल पेन्शन योजना, जीवन सुरक्षा विमा योजना अशा योजनांच्या माध्यमातून गरीबांना आम्ही आर्थिक लाभ मिळत आहे. तो माझा प्रयत्न आहे.
। सकाळी ७.५२ वाजता
विकासाच्या पिरॅमिडचा पाया मजबूत असेल आणि देशाच्या शेवटच्या व्यक्तीची खरेदीची शक्ती वाढली तर विकास होतो. आम्ही गरीबांच्या विकासावर भर देतोय.
। सकाळी ७.५१ वाजता
बँकाची शाखा उघडणं हीच मोठी बाब मानली जायची, खरंतर ही सोपी गोष्ट आहे पण बँकांमध्ये खाती उघडण्यासाठी खूप मेहनत घ्यायला लागते. त्यामुळे बँकांच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो. येत्या काळात खूप बदल घडणार आहे.
। सकाळी ७.५० वाजता
गरीबांच्या श्रीमंतीच्या बळावरच टीम इंडिया पुढे जाईल, हा मला विश्वास आहे.
। सकाळी ७.४९ वाजता
आम्ही निश्चित कालावधीत काम करण्याचा संकल्प केला आणि १७ कोटी लोकांनी पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत बँकांमध्ये खाती उघडली. शून्य शिल्लक हा आमचा संकल्प होता. परंतु माझ्या देशाच्या गरीबांच्या श्रीमंतीला माझा लाल किल्यावरून नमस्कार. गरीबांनी २० हजार कोटी रुपये बँक खात्यात जमा केलेत.
। सकाळी ७.४८ वाजता
गेल्या वर्षी मी जनधन योजना जाहीर केली होती. स्वातंत्र्यानंतर ६० वर्षांनी पण ४० टक्के लोकांना बँक सुविधा नव्हती. आम्ही फायनान्शियल इन्क्ल्युजनचा विचार मांडला. गरीबांना आर्थिक जगताशी जोडण्याचा प्रयत्न केलाय.
। सकाळी ७.४५ वाजता
गरीबाला गरिबीतून बाहेर काढायचेय. शासनव्यवस्थेची सार्थकता गरीबांच्या कल्याणासाठी असण्यातच आहे.
। सकाळी ७.४२ वाजता
लोकांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. टीम इंडियाचा एकच जनादेश आहे. तो जनादेश असा आहे की आमच्या सगळ्या व्यवस्था, योजना गरीबांच्या कामी यायला हव्यात.
। सकाळी ७.४० वाजता
आम्ही जे काही करतोय, जिथे कुठे जायचा प्रयत्न करतोय ते १२५ कोटी लोकांच्या टीमसह करतोय. या सगळ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
। सकाळी ७.३९ वाजता
जातिवाद आणि संप्रदायवाद यांना विकासाच्या माध्यमातून संपवायला हवे. देश १२५ कोटी लोकांच्या टीम इंडियाच्या भरोशावर पुढे जात आहे.
। सकाळी ७.३५ वाजता
प्राचीन संस्कृती आणि परंपरा बरोबरच भविष्याच्या उज्ज्वल स्वप्नांच्यासह देश जगत आलाय आणि एकता ही महत्त्वाची गोष्ट आहे. जातिवाद, संप्रदायवाद यांना कुठल्याही रुपात त्याला थारा देता कामा नये.
। सकाळी ७.३४ वाजता
विविधता, विशालता याचप्रमाणे प्रत्येक भारतीयाच्या मनात साधेभाव आहे तसेच जगभरातल्या भारतीयांच्या मनात एकता आहे हेच भारताचे वैशिष्ट्य आहे.
। सकाळी ७.३२ वाजता
अनेक भारतीयांनी जगभरात भारताची मान अभिमानानं ताठ ठेवली आहे. त्या सगळ्यांचं अभिनंदन
। सकाळी ७.३१वाजता
अनेकांनी देशाच्या स्वातंत्र्यांसाठी बलिदान केले. तुरुंगवास भोगला, त्यांनी संकल्प सोडला नाही. अशा स्वातंत्र्यसेनानींना कोटी कोटी प्रणाम
। सकाळी ७.३० वाजता
स्वातंत्र्यदिनानिमित्त १२५ कोटी भारतीयांना शुभेच्छा दिल्यात. १५ ऑगस्ट ही १२५ कोटी लोकांच्या स्वप्नाची आणि संकल्पाची पहाट
। सकाळी ७.३० वाजता
पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. राष्ट्रगीताने या सोहळ्याची सुरुवात झाली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.