www.24taas.com, वृत्तसंस्था, श्रीहरीकोटा
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आणखी एक सोनेरी पान आपल्या शिरपेचात खोवलंय. १३५० किलोचं मंगळ यान यशस्वीपणे प्रक्षेपित करत हा इतिहास रचलाय. या विशेष कामगिरीबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केले आहे.
या मोहीमेच्या यशानंतर इस्रोवर कौतुकाचा वर्षव होतोय. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मुरली मनोहर जोशी तसंच काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलंय. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आणखी एक सोनेरी पान आपल्या शिरपेचात खोवलंय. १३५० किलोचं मंगळ यान यशस्वीपणे प्रक्षेपित करत हा इतिहास रचलाय. त्याचबरोबर पीएसएलव्ही या प्रक्षेपकाचे हे सलग २४ वे यशस्वी उड्डाण ठरले आहे.
पीएसएलव्हीने चार टप्पे यशस्वीपणे पूर्ण करत मंगळयान अलगदपणे नियोजित कक्षेत सोडले... गेल्या २ वर्षातील कित्येक शास्त्रज्ञांची मेहनत फळाला आली. आता हे मंगळयान पृथ्वीभोवती येत्या काही दिवसात ५ चकरा लंबवर्तुळाकार कक्षेत पूर्ण करणार आहे. इतिहासामधील हा महत्त्वाचा टप्पा असल्याचं इस्रोचे संचालक डॉ. राधाकृष्णन म्हणाले.
इस्रोने आणखी एक सोनेरी पान आपल्या शिरपेचात खोवलंय. १३५० किलोचं मंगळ यान यशस्वीपणे प्रक्षेपित करत हा इतिहास रचलाय. त्याचबरोबर पीएसएलव्ही या प्रक्षेपकाचे हे सलग २४ वे यशस्वी उड्डाण ठरले आहे. दुपारी ठीक २ वाजून ३८ मिनिटांनी श्रीहरीकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटरच्या लाँचिंग पॅडवरून पीएसएलव्हीनं प्रक्षेपण केलं आणि शेकडो शास्त्रज्ञ-तंत्रज्ञांची गेल्या २ वर्षांची मेहनत फळाला आली.
आगीचा प्रचंड झोत सोडत आणि कानठळ्या बसवणारा आवाज पीएसएलव्ही झेपावलं आणि चार प्राथमिक टप्पे पार करत मंगळयान पृथ्वीच्या कक्षेत नेऊन सोडलं. महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण मोहीमेवर इस्रोनं अत्यंत कमी खर्च केलाय. नासा किंवा रशियन अंतराळ संस्था अशा मोहिमांवर शेकडो डॉलर्स खर्च करत असताना इस्रोनं केवळ ४५० कोटी रुपये, इतका आहे. म्हणजे देशाच्या प्रत्येक नागरिकामागे केवळ ४ रुपये या मोहीमेवर खर्च झालेत आणि हे शक्य झालंय शेतक-यांच्या गोफणीचं टेक्निक वापरून.
ज्या प्रमाणे गोफण जोरजोरात फिरवून पाखरं उडवण्यासाठी दगड भिरकावला जातो, तसंच काहीसं मंगळयानाचं होणार आहे. पृथ्वीभोवती पाच प्रदक्षिणा करताना यानाचा वेग सेकंदाला १२ किलोमीटर इतका वाढेल. साधारणतः १२० दिवसांनी मंगळ जेव्हा पृथ्वीच्या सर्वात जवळ आला असेल, तेव्हा यान मंगळाच्या दिशेनं भिरकावलं जाईल. या मोहीमेबद्दल इस्रो आणि तिथल्या शास्त्रज्ञ-तंत्रज्ञांवर कौतुकाचा वर्षाव होतोय.
मंगळयान पृथ्वीच्या कक्षेमध्ये पोहोचल्यावर आता त्याचं संपूर्ण नियंत्रण बंगळुरुमधल्या इस्रोच्या उपग्रह नियंत्रण विभागाकडे आहे. यशस्वी उड्डाण करून आणि मंगळयान पृथ्वीच्या कक्षेत सोडून या अवघड मोहीमेचा एक महत्त्वाचा टप्पा पार झालाय. आता बाकी आहे ते मंगळयानाला मंगळाजवळ नेणं आणि मंगळाचे नवनवे पैलू हाती येणं. यासाठी आता वर्षभराची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
पाहा व्हिडिओ
चार टप्पे यशस्वीपणे पूर्ण, मंगळयान नियोजित कक्षेत
पाहा व्हि़डिओ - http://bit.ly/17K29ow
#zee24taas #24taas #India #MarsOrbiterMission, #Sriharikota #spaceport