VIDEO : भारतात इसिसनं ३० हजार जणांशी केला ऑनलाईन संपर्क

दहशतवादी संघटना 'आयएसआयएस'नं भारतात आत्तापर्यंत जवळपास ३० हजार लोकांशी संपर्क केल्याचं धक्कादायक सत्य नुकतंच उघडकीस आलंय. 

Updated: Jan 28, 2016, 12:44 PM IST
VIDEO : भारतात इसिसनं ३० हजार जणांशी केला ऑनलाईन संपर्क title=

नवी दिल्ली : दहशतवादी संघटना 'आयएसआयएस'नं भारतात आत्तापर्यंत जवळपास ३० हजार लोकांशी संपर्क केल्याचं धक्कादायक सत्य नुकतंच उघडकीस आलंय. 

ऑनलाईन माध्यमातून हा संपर्क करण्यात आल्याची माहिती गुप्तचर संघटनेनं दिलीय. गुप्तचर संघटनेच्या म्हणण्यानुसार, भारतातील जवळपास ३० हजार लोक बगदादीसाठी काम करण्यासाठी तयार आहेत. 

इसिसची 'जॉब व्हॅकन्सी' जोरात सुरू आहे. यासाठी आयएसआयएस मोठी रक्कम मोजण्यासाठीही तयार आहे. त्यांच्याकडे दहशतवाद पसरवण्याची जबाबदारी सोपवण्यात आलीय.