आयटीआय विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी

आयटीआयचा कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत मोदी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Updated: May 31, 2016, 11:15 PM IST
आयटीआय विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी title=

नवी दिल्ली : आयटीआयचा कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत मोदी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आयटीआयचा कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता दहावी आणि बारावी पास असं गृहित धरलं जाणार आहे. 

आयटीआयचा कोर्स पू्र्ण केल्यानंतर जे सर्टिफिकेट मिळतं त्याबरोबर दहावी किंवा बारावी पास असल्याचं सर्टिफिकेटही दिलं जाणार आहे. म्हणजेच जर आठवीनंतर विद्यार्थ्यानं आयटीआयचा कोर्स केला तर त्याला

आयटीआयबरोबरच दहावी पास झाल्याचंही सर्टिफिकेट दिलं जाईल. तर दहावीनंतर आयटीआय केलेल्या विद्यार्थ्याला आयटीआय आणि बारावी पासचं सर्टिफिकेट मिळेल. 

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि कौशल्य विकास मंत्रालय या दोन खात्यांनी हा करार केला आहे. या कराराचा असंख्य आयटीआयच्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.