अवघ्या ९०८ रुपयांमध्ये जेट एअरवेजनं करा विमान प्रवास!

आता अवघ्या ९०८ रुपयांमध्ये जेट एअरवेजनं विमान प्रवास करू शकता. विमान सेवा देणाऱ्या कंपनीनं नुकतीच ही घोषणा केलीय. मार्केटमध्ये वाढलेली स्पर्धा आणि एअर एशियाचं बजेट विमान भाडं याचा मुकाबला करण्यासाठी जेट एअरवेजनं सर्व मार्गांवर आपल्या तिकीटांच्या किमती कमी केल्या आहेत. 

Updated: Sep 24, 2014, 12:08 PM IST
अवघ्या ९०८ रुपयांमध्ये जेट एअरवेजनं करा विमान प्रवास! title=

नवी दिल्ली: आता अवघ्या ९०८ रुपयांमध्ये जेट एअरवेजनं विमान प्रवास करू शकता. विमान सेवा देणाऱ्या कंपनीनं नुकतीच ही घोषणा केलीय. मार्केटमध्ये वाढलेली स्पर्धा आणि एअर एशियाचं बजेट विमान भाडं याचा मुकाबला करण्यासाठी जेट एअरवेजनं सर्व मार्गांवर आपल्या तिकीटांच्या किमती कमी केल्या आहेत. 

तिकीटांचं नवं भाडं म्हणजे एअरलाइन्सच्या प्रमोशनल स्कीमचा भाग आहे आणि हे भाडं इकॉनॉमी क्लास आणि एअर एशियाच्या मार्गांवरही लागू असेल. या ऑफर अंतर्गत ५ ऑक्टोबरपर्यंत आपण तिकीटांचं बुकिंग करू शकता. १५ जानेवारी २०१५ पर्यंत या तिकीटवर तुम्ही प्रवास करू शकाल. 

एअर एशियानं नुकतीच प्रमोशनल इव्हेंट अंतर्गत ६९० रुपयांमध्ये विमान प्रवासाची ऑफर दिलीय. ही बुकिंग ५ ऑक्टोबरपर्यंत सुरू असेल. त्याद्वारे १५ जानेवारी ते ३० जून २०१५पर्यंत तुम्ही प्रवास करू शकाल.  

कोच्ची-बंगळुरूसाठी जेट एअरवेजचं तिकीट ९०८ रुपये आहे, तर बंगळुरू-कोच्चीची किंमत १,१६२ रुपये, बंगळुरू-चेन्नई – १,१६२, तर चेन्नई-बंगळुरू १,१०७ रुपये ठेवण्यात आलीय.
एका रिपोर्टनुसार घरगुती एअरलाइन्सनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जुलैमध्ये ५२.६० लाख होती, जी ऑगस्टमध्ये वाढून ५६.६७ लाख झाली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.