मोदींपाठोपाठ केजरीवाल ट्विटरवर सर्वाधिक लोकप्रिय

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरवरही ते मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होतायत.

Updated: Nov 19, 2015, 06:23 PM IST
  मोदींपाठोपाठ केजरीवाल ट्विटरवर सर्वाधिक लोकप्रिय title=

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरवरही ते मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होतायत.

ट्विटरवर सर्वाधिक फॉलो करणाऱ्यांच्या यादीत मोदींपाठोपाठ केजरीवालांचा नंबर लागतो. केजरीवाल या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत.

केजरीवालांच्या फॉलोअर्सनी बुधवारी ६० लाखांचा आकडा पार केला.आम आदमी पक्षाचे सोशल मिडीया प्रमुख अंकित लाल यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली.

या क्रमवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या स्थानी आहेत. त्यांचे १.६ कोटी फॉलोअर्स आहेत. तर केजरीवालांचा दुसरा नंबर आहे. काँग्रेसचे नेते शशी थरुरही ट्विटरवर सवार्धिक फॉलो केले जाणारे नेते आहेत.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.