तिरुअनंतपुरम - 'किस ऑफ लव्ह' कॅम्पेनचे आयोजक राहुल आणि रश्मी नायर यांना पोलिसांनी सेक्स रॅकेट चालवण्याच्या आरोपाखाली अटक केलीय.
पोलिसांनी बुधवारी राहुल आणि रश्मी यांच्यासह आठ जणांना या आरोपाखाली अटक केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. सोशल मीडियाद्वारे हे लोक सेक्स रॅकेट चालवत होते असे पोलिसांनी म्हटले आहे.
सोशल मीडियाद्वारे सेक्स रॅकेट चालवले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर यातील आरोपींना पकडण्यासाठी सायबर सेलने सापळा रचला. गेल्या वर्षी राहुल आणि रश्मीने मॉरल पॉलिसिंगला विरोध करत 'किस ऑफ लव्ह' कँपेन चालवले होते. त्यानंतर दिल्लीसह अनेक शहरात हे कँपेन चालवण्यात आले होते.
कोचीमधील एका कॅफेत एका जोडप्याने एकमेकांना किस दिलं. याविरोधात राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी कॅफेची तोडफोड केली. यातूनच जन्म झाला किस ऑफ लव्ह कँपेनचा. मोठ्या संख्येने तरुणाई यात सामील झाली. काही ठिकाणी आंदोलनेही झाली. फेसबुक पेज तयार करण्यात आले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.