नवी दिल्ली : भारतीय लष्कराने 2011मध्येही पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता. इंग्रजी वृत्तपत्र 'द हिंदू'ने आपल्या रिपोर्टमध्ये असा दावा केलाय.
द हिंदूमधील रिपोर्टनुसार, 30 जुलै 2011मध्ये पाकिस्तानने गुगलधार येथील
आर्मी पोस्टवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 6 भारतीय जवान शहीद झाले होते. त्यातील दोन भारतीय जवानांचे शीर धडावेगळे करत पाकिस्तानात नेण्यात आले होते. त्यानंतर महिन्याभरातच भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला.
पाकिस्तानने भारतावर केलेल्या हल्ल्यानंतर भारताने याचे प्रत्युत्तर म्हणून पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून कारवाई केली होती. या कारवाईला ऑपरेशन जिंजर असे नाव देण्यात आले होते.
30 ऑगस्ट 2011मध्ये भारतीय लष्कराने ही कारवाई केली होती. भारताने केलेल्या या कारवाईत पाकिस्तानचे 8 जवान ठार झाले. यापैकी तीन जवानांचे शिरच्छेद करुन त्यांचे शीर भारतात आणण्यात आले होते. मेजर जनरल(निवृत्त) एस.के. चक्रवर्ती यांनी हे ऑपरेशन केले होते.