देहराडून : उत्तराखंडमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पर्वताला भेगा पडून जमीन भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. यातच रविवारी चमोली भागात भूकंपाचे सौम्य धक्केही जाणवले. या धक्क्यांची तीव्रता सुमारे ४.० रिश्टर स्केल एवढी होती.
सकाळी ५ वाजून १८ मिनिटांनी चमोलीतील नागरिकांना धक्के जाणवले. उत्तराखंडात असलेल्या वरुणावत पर्वताच्या डोगराला भेगा पडल्या आहेत. तसेच याच डोंगरावर काही अंतराने भूस्खलन होत आहे. यामुळे सुमारे दहा हजार लोकांचा जीव धोक्यात आला आहे.
प्रशासनाने खबरदारीसाठी भूस्खलन होत असलेल्या भागात तांत्रिक गटाला पाठवण्यात आले आहे.
वरुणावत पर्वतावर तडे पडू नयेत, म्हणून २००३ मध्ये १७०० मीटर उंचीवर ट्रिटमेंट केली होती. यासाठी सरकारने २८० कोटी खर्च केले होते. काम निकृष्ठ दर्जाचे केल्यामुळे आता अशी परिस्थिती ओढावली आहे, असा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.