हैदराबाद : एका भारतीय कार डिझायनरला बनवायचंय एक अनोखा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड... यासाठी त्यानं एक अनोखी कारही तयार केलीय.
हैदराबादला राहणाऱ्या सुधाकर यादव यांनी एक 26 फूट उंच आणि 50 फूट लांब कार बनवलीय. ही कार 1922 च्या फोर्ड टुअर कारचं मॉडल आहे. लंडनच्या डबल डेकर बसपेक्षा ही कार दुप्पट मोठी आहे. ही कार फॉर्म्युला वन कारच्या आवाजाची नक्कलही करते... पण, ती रस्त्यावर मात्र धावू किंवा चालू शकत नाही.
उल्लेखनीय म्हणजे, सुधाकर यांच्या नावावर जगातील सर्वांत उंच तीन चाकांच्या सायकलचाही रेकॉर्ड आहे. या सायकलची उंची 41.5 फूट आहे.
सुधाकरचं हैदराबादमध्ये कार्सचं एक म्युझियमही आहे. यामध्ये, त्यांनी बनवलेल्या वेगवेगळ्या आकारांच्या कार ठेवण्यात आल्यात. टॉयलेट कमोड, वांग, बिलयर्डस् टेबल आणि लिपस्टिक अशा नानाविध आकाराच्या कार इथं ठेवलेल्या दिसतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.