अशोक चव्हाणांविरोधात विरोधक एकवटले!

नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकीत यावेळी रंगतदार लढत होणार आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधात सर्व विरोधकांनी एकजूट केलीय.

Updated: Nov 1, 2016, 03:07 PM IST
अशोक चव्हाणांविरोधात विरोधक एकवटले! title=

नांदेड : नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकीत यावेळी रंगतदार लढत होणार आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधात सर्व विरोधकांनी एकजूट केलीय.

काँग्रेसचे उमेदवार राजुरकर यांच्या विरोधात सेवानिवृत्त सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलंय. 

इतकच नाही तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या शिंदेंना राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसंच भाजपनंही पाठिंबा द्यायचं ठरवलंय. 

श्यामसुंदर शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना आमदार, भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांची उपस्थिती होती. त्यामुळं अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.