महत्त्वाचं : आधार कार्ड आणि मतदान कार्ड एकमेकांना असं जोडा!

खोट्या मतदारांना निकालात काढण्यासाठी आता आधार क्रमांक प्रत्येक मतदाराच्या मतदान ओळखपत्राशी जोडण्याचं काम सुरू झालंय. यासाठी खऱ्या नागरिकांचं सहाय्य आवश्यक आहे. 

Updated: Apr 3, 2015, 12:26 PM IST
महत्त्वाचं : आधार कार्ड आणि मतदान कार्ड एकमेकांना असं जोडा! title=

नवी दिल्ली : खोट्या मतदारांना निकालात काढण्यासाठी आता आधार क्रमांक प्रत्येक मतदाराच्या मतदान ओळखपत्राशी जोडण्याचं काम सुरू झालंय. यासाठी खऱ्या नागरिकांचं सहाय्य आवश्यक आहे. 

आपला आधार क्रमांक आपल्या मतदान ओळखपत्राशी जोडण्यासाठी तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. कारण, हे केवळ एका क्लिववर शक्य आहे... किंवा तुमच्या मोबाईलवरही ही सुविधा उपलब्ध आहे. 

'एसएमएस'च्या साहाय्यानं...

  • 'एसएमएस'च्या साहाय्यानं आधार क्रमांक आपल्या व्होटर कार्डाशी लिंक करण्यासाठी ECILINK टाईप करून स्पेस द्या...

  • त्यानंतर आपला व्होटर आयडी नंबर लिहून पुन्हा एक स्पेस द्या

  • त्यानंतर, आपला आधार नंबर लिहा

  • आणि हा मॅसेज पाठवा ५१९६९ या क्रमांकावर

  • यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि व्होटर कार्डाचा क्रमांक जोडला जाईल.

'ऑनलाईन' कसं कराल?

  • आधार क्रमांक आणि व्होटर कार्डाचा क्रमांक ऑनलाईन जोडण्यासाठी nvsp.in या वेबसाईटवर जा.

  • Feed Your Aadhaar Number या ऑप्शनवर क्लिक करा.

  • यानंतर, एक नवीन वेबपेज ओपन होईल. इथं मागितलेली माहिती भरल्यानंतर रजिस्ट्रेशन करावं लागेल.

  • यामध्ये ई-मेल आयडी भरावा लागेल. या ईमेलवर तुम्हाला दोन्ही नंबर एकमेकांना जोडल्याचा कन्फर्मेशन मेल मिळेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.