www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
लोकपाल विधेयक मंजुरीसाठी सरकार आज राज्यसभेत मांडण्याची शक्यता आहे. लोकपाल विधेयक शुक्रवारी म्हणजे आज चर्चेला आणवं अशी मागणी केलीय. दरम्यान, भाजपने विरोध केलाय तर राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे.
खासगी विधेयकाचा आणि चालू आठवड्याचा अखेरचा दिवस असल्याने लोकपालला आज मुहूर्त मिळतो याबाबत शंका उपस्थित करण्यात येतेय. त्यामुळे हे विधेयक सोमवारी संसदेत मांडलं जाईल, अशीही चर्चा सुरू आहे. संसदीय निवड समितीने मंजूर केलेल्या लोकपाल विधेयकातील १३ आणि भाजपच्या दोन अतिरिक्त अशा १५ दुरूस्त्यांसह विधेयक मंजूर करावं, या मागणीवर भाजप ठाम आहे.
सरकार आणि भाजप आपली बाजू जास्त वेळ ताणून धरण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे हे विधेयक मंजूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय. लोकपाल विधेयक सर्वप्रथम १९७७ मध्ये संसदेत सादर झालं होतं. त्यानंतर चार ते पाचवेळा हे विधेयक पुढे ढकलण्यात आलं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.