धक्कादायक : मुलीसोबत करत होता रेप, इतरांनाही बोलवत होता घरी

Updated: Aug 13, 2015, 06:11 PM IST
धक्कादायक : मुलीसोबत करत होता रेप, इतरांनाही बोलवत होता घरी title=

 

मेरठ : मुलीवर बलात्कार करणाऱ्या पित्याची नवी मुंबईतील घटना ताजी असताना आता अशी एक घटना मेरठमध्ये घडली आहे. पिता स्वतः बलात्कार करत असे आणि इतर तरूणांना घरी बोलवून मुलीसोबत जबरदस्ती करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

मुलगी आपल्या आजी-आजोबांकडे गेली असता तिने वडिलाच्या कृत्याचा पाढाच वाचला आणि हे प्रकरण समोर आले. वडील मुलीला घेण्यासाठी सासरी आल्यावर मुलीच्या आई, आजी आणि इतर कुटुंबियांनी त्याला चांगला चोप दिला. त्याची रवानगी पोलिस स्टेशनला केली. 
 
मेरठमध्ये २० वर्षांपूर्वी लग्न झाल्यावर वादानंतर महिला आपल्या माहेरी निघून गेली. या महिलेने एका मुलीला जन्म दिला होता. पण मुलगी वडिलांकडेच १७ वर्ष राहिली. पण याच मुलीने आपल्या पित्यावर गंभीर आरोप लावत सांगितले की, वडिलांनी दारूच्या नशेत अनेकवेळा बलात्कार केला. तसेच इतर तरूणांनाही घरी आणले आणि त्यांच्या सोबत जाण्यास सांगितले. या छळाला कंटाळून तरूणीने आपल्या आजी-आजोबांकडे जाण्याचा हट्ट केला. 

आठ ऑगस्टला ज्ञान चंद हा आपल्या मुलीला घेऊन स्टेशनला गेला. त्यावेळी मुलीला सांगितले की तू अनाथ आहे. तुझे कोणी नाही. स्वतः पाणी घेण्यासाठी सांगून गायब झाला. एक दिवस स्टेशनवर भीक मागून मुलीने दिवस काढला. ९ ऑगस्टला ज्ञानचंद पुन्हा स्टेशनवर पोहचला आणि मुलीला आपल्या आजी-आजोबांकडे सोडले. १० ऑगस्टला पु्न्हा सासरी पोहचून मुलीला घेतला आणि पुन्हा स्टेशनवर आणून सोडून दिले. मुलीने भीक मागून चाळीस रुपये कमविले पण ते पुन्हा त्याने घेतले आणि गेला. 

मुलगी जीआरपीकडे गेली, तीने आपला पत्ता सांगितला आणि पोलिसांनी तिला आपल्या आजी-आजोबांकडे पोहचविले. १२ ऑगस्टला वडिल पुन्हा तिला घेण्यासाठी सासरी आले. त्यावेळी मुलीने त्याच्या कूकृत्य उघडकीस आणले. मग त्याला कुटुंबियांनी चांगला चोप दिला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.