www.24taas.com, झी मीडिया, अनंकनाग/काश्मीर
श्रीनगरच्या अनंतनागमधल्या मधमासंगम परिसरात एअर फोर्सचं मिग-21 विमान दुर्घटनाग्रस्त झालंय. त्यात पायलटचा मृत्यू झालाय. मृत पायलटचं नाव रघू बन्सी हे आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या ट्विट करुन दुर्घटनेच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला.
Reports coming in of a Mig fighter having crashed in South Kashmir. Hope the pilot & the people on the ground are safe #prayers
— Omar Abdullah (@abdullah_omar) May 27, 2014
आजच पंतप्रधान आणि संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या नरेंद्र मोदी यांना बिकट आव्हानांची जाणीव करुन देणारी ही दुर्घटना असल्याचं मत जाणकारांनी व्यक्त केलंय.
मिग या जुन्या झालेल्या लढाऊ विमानांची जागा घेण्यासाठी नवी लढाऊ विमानं घेण्याचा निर्णय झाला असला तरी टप्प्याटप्प्यानं होणार असलेली ही प्रक्रिया पूर्ण होण्यास आणखी बराच काळ लागणार आहे. त्यामुळं आजही देशात मिग विमानांचा वापर होत आहे. अशा निराशाजनक वातावरणात मिग विमानांच्या दुर्घटनांमुळं भर पडत आहे. प्रत्येक विमान अपघातामुळे देशाचे कोट्यवधींचे नुकसान होतंय. तसंच भारताला स्वतःचे अत्यंत गुणी असे वैमानिक गमवावे लागत आहेत.
पंतप्रधान मोदी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या सहकार्यानं संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारणार आहे. मोदी यांच्या सरकारपुढं तिन्ही संरक्षणदलांच्या आधुनिकीकरणाचा वेग वाढवणं आणि दुर्घटना रोखणं हेच मोठं आव्हान असल्याचं मत जाणकार व्यक्त करत आहेत.
J&K : Spot where the MiG-21 Aircraft crashed in Anantnag pic.twitter.com/H6nOsGuwGf
— ANI (@ANI_news) May 27, 2014
दरम्यान, ही खूपच दुःखद घटना आहे, आम्ही याची गंभीर दखल घेतली आहे, अशी प्रतिक्रिया अरुण जेटली यांनी व्यक्त केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.