अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा

बॉलिवूड अभिनेता आणि टीएमसी नेते मिथुन चक्रवर्ती यांनी  राज्यसभेच्या खासदारपदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृती खराब असल्याच्या कारणामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचं म्हटलं जातंय.

Updated: Dec 26, 2016, 10:10 PM IST
अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा title=

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता आणि टीएमसी नेते मिथुन चक्रवर्ती यांनी  राज्यसभेच्या खासदारपदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृती खराब असल्याच्या कारणामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचं म्हटलं जातंय.

मिथुन चक्रवर्तीने मागील आठवड्यातच खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. खूप दिवसांपासून मिथून यांची प्रकृती खराब आहे. अनेक दिवसांपासून त्यांनी राज्यसभेतून सुट्टी देखील मागितली होती.

दुसरीकडे सारधा कांडमध्ये मिथुन चक्रवर्ती यांचं नाव आल्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे. मिथुन चक्रवर्ती यांची राज्यसभेची सदस्यता एप्रिल २०२० पर्यंत होती. त्यांच्या जागी आता दुसऱ्याला खासदार बनवण्यात येईल. अजून कोणाचंही नाव पुढे आलेलं नाही.