पंतप्रधान मोदी म्हणजे राष्ट्रऋषी - बाबा रामदेव

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे राष्ट्रऋषी असल्याचं बाबा रामदेव यांनी म्हटलंय. मोदींच्या हस्ते आज पतंजलीच्या संशोधन केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं.

Updated: May 3, 2017, 02:53 PM IST
पंतप्रधान मोदी म्हणजे राष्ट्रऋषी  - बाबा रामदेव title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे राष्ट्रऋषी असल्याचं बाबा रामदेव यांनी म्हटलंय. मोदींच्या हस्ते आज पतंजलीच्या संशोधन केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं.

हरिद्वारमधील पतंजली योगपीठात पतंजली संशोधन केंद्राचं उद्घाटन पार पडलं. या प्रसंगी मोदींच्या सत्कारार्थ केलेल्या भाषणात बाबा रामदेव यांनी मोदींची स्तुती केली. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी संशोधनावर भर देण्याचं आवाहन केलं. 

दरम्यान, संशोधन केंद्रांचे उद्घाटन केल्यानंतर मोदींच्या आपल्या भाषणात बाबा रामदेव यांच्या योग पीठात सुरु असलेल्या कामाचंही पंतप्रधानांनी कौतुक केलं.