www.24taas.com, नवी दिल्ली
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधींपासून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे ट्विटर खाते केंद्र सरकारने बंद केले आहे. सुरक्षा आणि घृणा पसरवित असल्यावर प्रतिबंध घालण्याच्या कारण देत केंद्र सरकारतर्फे या ट्विटर बंद करण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयावर सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. सरकारचा निषेध करण्यासाठी मोदींनी आपल्या ट्विटर खात्यावर काळा फोटो टाकला आहे.
सामान्य नागरिक म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात केंद्र सरकारने केलेल्या कारवाईच्या विरोधात मीही सामील असल्याचे नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर खात्यात ट्विट केले आहे. यावेळी त्यांनी काळा फोटोही पोस्ट केला आहे. मी माझे डिस्प्ले पिक्चर बदलत आहे, सबको सन्मती दे भगवान, असेही मोदी यांनी म्हटले आहे.
सरकार ट्विटरवर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची परवानगी देत नाही आणि विरोधी पक्ष त्यांना संसदेत बोलू देत नाही, असे सामाजिक कार्यकर्ता आणि स्तंभलेखक तुषार गांधी यांनी ट्विट केले आहे.