पत्नीचे बॉयफ्रेंडसोबत होते संबंध, पतीला कळाल्यानंतर हॉकी स्टिकने मारून घेतला जीव

पत्नीचे आपल्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडसोबत संबंध असल्याच्या संशयाने वेडा झालेल्या पतीने पत्नीला हॉकी स्टीकने बेदम मारहाण केली. त्यानंतर राग अनावर झाल्यावर पत्नी तिचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना भोपाळमध्ये घडली आहे. 

Updated: Aug 19, 2016, 05:50 PM IST
पत्नीचे बॉयफ्रेंडसोबत होते संबंध, पतीला कळाल्यानंतर हॉकी स्टिकने मारून घेतला जीव

भोपाळ : पत्नीचे आपल्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडसोबत संबंध असल्याच्या संशयाने वेडा झालेल्या पतीने पत्नीला हॉकी स्टीकने बेदम मारहाण केली. त्यानंतर राग अनावर झाल्यावर पत्नी तिचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना भोपाळमध्ये घडली आहे. 

पत्नीची हत्या केल्यानंतर वैफल्यग्रस्त पती स्वतःहून आपला गुन्हा कबूल करण्यासाठी पोलीस स्टेशनला हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक केली

ही घटना मध्यप्रदेशच्या राजधानीतील ऐशबाग पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बाग दिलकुशा भागातील आहे. गुरुवारी दुपारी हा साधारण तीन वाजता ही हत्या झाली. 

ऐशबाग पोलिस स्टेशनच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 वर्षांचा जाहिद बेगचा काच कटिंगचे काम करतो. 

10 दिवसांपूर्वीच तो पत्नी ईशासोबत बाग दिलकुशा येथे राहायला आला होता. 

याआधी तो सासूरवाडी अशोका गार्डन येथे राहात होता. जाहिद आणि इशा यांचे एक वर्षापूर्वीच लग्न झाले होते.