केवळ एकाच्या नाही, सर्वांच्या सहकार्यानं विजय- भागवत

लोकसभेत भाजपच्या यशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमित शहांना ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कार दिला असला तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं यामताशी असहमतीच दर्शवली आहे.  

PTI | Updated: Aug 11, 2014, 11:56 AM IST
केवळ एकाच्या नाही, सर्वांच्या सहकार्यानं विजय- भागवत title=

भुवनेश्वर: लोकसभेत भाजपच्या यशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमित शहांना ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कार दिला असला तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं यामताशी असहमतीच दर्शवली आहे. हे एका व्यक्ती, पक्ष किंवा संघटनेमुळं मिळालेलं यश नसून सामान्य माणसामुळं मिळालेलं यश आहे. सर्वसामान्य भारतीयाला बदल हवा असल्यानंच हे यश मिळू शकलं, असं मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडलं आहे. 

भुवनेश्वर इथं संस्कृती सुरक्षा समितीतर्फे रक्षाबंधन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी बोलताना मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानाशी विसंगत भूमिका मांडली. भागवत म्हणाले, काही लोक म्हणतात की पक्षाला यश मिळालं.

तर काही लोक म्हणतात एका व्यक्तीसाठी हे यश मिळालं. मात्र प्रत्यक्षात एका व्यक्ती, पक्ष किंवा संघटनेमुळं हे यश मिळालेलं नाही. आम आदमीला बदल हवा होता आणि त्यांनीच हे परिवर्तन घडवून आणलं. 'यश मिळवणारी व्यक्ती, पक्ष यापूर्वीही अस्तित्वात होते. पण मग ते याआधीच निवडून का आले नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

जर लोकं आनंदात नसतील तर पुढील लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा सत्ताबदल करतील, असं भागवत यांनी नमूद केलं. जर्मनीत राहणारे जर्मन, अमेरिकेत राहणारे अमेरिकी तर भारतात राहणारे हिंदू का होऊ शकत नाही, असा सवाल मोहन भागवत यांनी अन्य एका कार्यक्रमात उपस्थित केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.