मान्सून वेळेआधीच दाखल होणार, हवामान खात्याचा अंदाज

हवामान खात्याच्या सुधारित अंदाजानुसार पाऊस ३० मेच्या आधीच केरळ किनारपट्टीवर दाखल होईल. गेल्या 48 तासांत मान्सूनच्या प्रगतीचा वेग वाढल्यानं सुधारित अंदाज देण्यात आलाय. 

Updated: May 24, 2017, 07:22 PM IST
मान्सून वेळेआधीच दाखल होणार, हवामान खात्याचा अंदाज title=

मुंबई : हवामान खात्याच्या सुधारित अंदाजानुसार पाऊस ३० मेच्या आधीच केरळ किनारपट्टीवर दाखल होईल. गेल्या 48 तासांत मान्सूनच्या प्रगतीचा वेग वाढल्यानं सुधारित अंदाज देण्यात आलाय.

सामान्यपणे १ जूनला केरळमध्ये धडक मारणारा मान्सून यंदा दोन तीन दिवस लवकर येण्याचं भाकित हवामान खात्यानं आधीच वर्तवलंय. अल निनो आणि पोषक वातावरणीय परिस्थितीचा विचार करता मान्सूनचं आगमन आणखी लवकर होणार आहे. त्याचप्रमाणे यंदा सरासरीइतकाच पाऊस होईल असंही हवामान खात्यानं म्हटलंय.