धक्कादायक: अंध विद्यार्थ्याला शिक्षकाची बेदम मारहाण

आंध्र प्रदेशच्या काकिनाडामध्ये एका अंध शाळेत मुख्याध्यापक आणि शिक्षकानं एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केलीये.

Updated: Jul 21, 2014, 06:03 PM IST
धक्कादायक: अंध विद्यार्थ्याला शिक्षकाची बेदम मारहाण title=

काकिनाडा, आंध्र प्रदेश: आंध्र प्रदेशच्या काकिनाडामध्ये एका अंध शाळेत मुख्याध्यापक आणि शिक्षकानं एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केलीये.

एक छोटीशी चूक या मुलाला प्रचंड महागात पडलीये. जो बिचारा मुलगा आपल्याला कोण मारतंय हे बघूही शकत नाही, त्याला अशा पद्धतीनं मारहाण करणाऱ्यांनी आपल्या शिक्षकी पेशाला काळीमा फासलाय.

हा मुलगा मार खात असताना रडत-किंचाळत होता. पण ना मारणाऱ्या मुख्याध्यापक आणि शिक्षकाला त्याची दया आली ना अन्य शिक्षकांना... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.