ज्यास्त सेक्समुळे आयुष्य घटते!, भाजप खासदाराचा भन्नाट शोध

वारंवार सेक्स केल्यामुळं आयुष्य घटतं असा भन्नाट शोध मध्य प्रदेशातील भाजप खासदार आलोक संजर यांनी लावला आहे. एका टेस्ट ट्युब बेबी सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 

PTI | Updated: Dec 30, 2014, 12:32 PM IST
ज्यास्त सेक्समुळे आयुष्य घटते!, भाजप खासदाराचा भन्नाट शोध title=

भोपाळ: वारंवार सेक्स केल्यामुळं आयुष्य घटतं असा भन्नाट शोध मध्य प्रदेशातील भाजप खासदार आलोक संजर यांनी लावला आहे. एका टेस्ट ट्युब बेबी सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 

संजर यांनी भगवान श्रीकृष्णाचा दाखलाही यावेळी दिला. ‘मूल हवं असेल तर शरीरसंबंध ठेवा’असं खुद्द श्रीकृष्णानंच सांगितलं असल्याचं ते म्हणाले. जास्त मुलं असतील तर १२ वर्षांतून एकदा संबंध ठेवावा.

त्यानंतरही इच्छा झालीच तर वर्षातून एकदा किंवा सहा महिन्यांतून एकदा आणि त्याहूनही जास्त इच्छा झाल्यास महिन्यातून एकदा संबंध ठेवावा, असंही त्यांनी पुढं स्पष्ट करून सांगितलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.