लग्नाच्या एक दिवस आधी आईने केली मुलीची हत्या

दिल्लीच्या सीलमपूर भागात आईने लग्नाच्या एक दिवस आधी आपल्या मुलीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडलीये. 

Updated: Mar 14, 2016, 01:00 PM IST
लग्नाच्या एक दिवस आधी आईने केली मुलीची हत्या title=

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीलमपूर भागात आईने लग्नाच्या एक दिवस आधी आपल्या मुलीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडलीये. 

लग्नाच्या आधीच्या रात्री भाडेकरु तरुणासोबत आपल्या मुलीला विचित्र अवस्थेत पाहिल्यानंतर संतापलेल्या आईने मुलीची गळा दाबून हत्या केली. यादरम्यान तो तरुण मात्र तेथून पळून गेला. 

दुसऱ्याच दिवशी मुलीचे लग्न होणार होते. घरात पाहुण्याची वर्दळ होती. जेव्हा मुलीची आई आणि तिचा भाऊ तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये आले तेव्हा ही घटना समोर आली. यावेळी मात्र मुलीने आत्महत्या केल्याचा दावा मुलीचे कुटुंबिय करत होते. 

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आई आणि मुलाविरोधात गुन्हा दाखल केलाय. या मुलीचे गाझियाबाद येथील एका व्यवसायिकाशी लग्न होणार होते.