www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
कर्ज फेडण्यात अपयशी ठरलेल्या व्यक्तींवर दबाव टाकण्यासाठी बँकांनी ‘नेम अॅन्ड शेम’ नावाचा नवा फंडा अंमलात आणायला सुरुवात केलीय. आता याच फंड्यात कर्जधारक व्यक्तींसोबतच त्यांचे जामीनदार अर्थात गॅरेंटर्सही अडचणीत येण्याची शक्यता आहे.
‘नेम अॅन्ड फेम’द्वारे कर्जधारकांसोबतच त्यांना जामीन राहिलेल्या व्यक्तींवर कारवाई केली जाणार आहे. ‘लोन डिफॉल्टर्स’वर मानसिक दबाव टाकण्यासाठी त्यांच्या गॅरंटर्सची नावं, फोटो आणि त्यांची माहिती सार्वजनिक करण्याचा निर्णय बँकांनी घेतलाय.
बँकांना म्हणण्यानुसार, नोटीस मिळाल्यानंतर १५ दिवसानंतर कर्जदारांनी कर्ज फेडलं नाही तर ‘नेम अॅन्ड शेम’द्वारे विविध जाहिरातींमधून आणि कम्युनिटी सेंटर्सद्वारे त्यांच्या गॅरंटर्सची माहिती सार्वजनिक केली जाईल’. बँकांनीच घेतलेल्या या नव्या निर्णयाची सुरुवात केलीय ती अलाहाबाद बँकेनं... एका जाहिरातीत दोन गॅरंटर्सची नावं, फोटो आणि माहिती अलाहाबाद बँकेनं दिलीय.
यंदाच्या वर्षाच्या सुरुवातापासूनच बँकांनी कर्जधारकांची माहिती सार्वजनिक करणं सुरु केलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.