नवी दिल्ली : विरोधकांच्या गोंधळात कालपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज मोदी सरकार आपलं पहिलं रेल्वे बजेट मांडणार आहे. नुकतीच रेल्वे भाडेवाढ केल्यानंतर आता रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्या पोतडीत नेमकं काय आहे, याची उत्सुकता आहे.
मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारचा पहिला रेल्वे अर्थसंकल्प आज मंगळवारी संसदेत सादर केला जाईल. याआधी सरकारने अर्थसंकल्पापूर्वीच प्रवासी आणि माल वाहतूक भाडय़ात मोठी वाढ केलेली आहे. त्यामुळे नव्या काय घोषणा होतात, याची उत्सुकता शिगेला आहे.
निवडणुकीपूर्वी जनतेला स्वप्न दाखवलेल्या भाजप सरकारकडून प्रवाशांना अपेक्षा आहेत. महाराष्ट्र आणि मुंबईकरांच्या वाट्याला काय येणार याकडेही लक्ष लागले आहे. तर प्रवास भाडय़ापोटी मिळणाऱ्या उत्पन्नात दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे रेल्वे अर्थसंकल्पात अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याची व्यूहरचना जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
रेल्वे बजेटमध्ये काय असेल खास?
# अनेक अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशा ट्रेन्सच्या घोषणेची शक्यता
# ज्याचं भाडे विमान भाड्याप्रमाणे कमी-जास्त करता येईल
# रेल्वेची वेबसाईट अपडेट करण्याबाबतही घोषणा होण्याची शक्यता.
# सीट उपलब्ध असणा-या रेल्वेची माहिती मिळणार ?
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.