नरेंद्र मोदीच होणार पंतप्रधान, सर्व्हेक्षणांचा निकाल

भाजपच्या नेतृत्वात एनडीएलाच आगामी लोकसभा निवडणुकीत २२० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा अंदाज निवडणूक पूर्वी घेण्यात आलेल्या सर्व्हेक्षणातून पुढं आलंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 25, 2014, 10:48 AM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भाजपच्या नेतृत्वात एनडीएलाच आगामी लोकसभा निवडणुकीत २२० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा अंदाज निवडणूक पूर्वी घेण्यात आलेल्या सर्व्हेक्षणातून पुढं आलंय.
एक वृत्तवाहिनी आणि सीएसडीएसद्वारे केल्या गेलेल्या सर्व्हेक्षणानुसार निवडणुकीत काँग्रेसला चांगलाच परभाव स्वीकारावा लागेल. तृणमुल काँग्रेस आणि अण्णा द्रमुक सारख्या प्रादेशिक पक्षांनाही फायदा होण्याची शक्यता आहेय आम आदमी पक्ष पण चांगल्या जागा मिळवेल.
सर्व्हेक्षणानुसार भाजपला एकट्याला १९२-२१० जागा मिळतील. तर काँग्रेसला केवळ ९२-१०८ जागांवर समाधान मानावं लागेल. एनडीएला २११-२३१ जागा मिळतील तर यूपीएला १०७-१२७...ममता बॅनर्जीच्या तृणमुल काँग्रेसला २०-२८ जागा मिळतील तर जयललिता यांच्या अण्णाद्रमुकला १५-२३ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
डाव्या पक्षांना १५-२३ जागा मिळू शकतात आणि `आप`ला ६-१२ जागा मिळण्याची शक्यता आहे. सर्व्हेक्षणानुसार समाजवादी पक्षाला केवळ ८-१४ आणि बहुजन समाज पक्षाला १०-१६ जागा मिळतील.
२००९ च्या निवडणुकांशी तुलना केली तर एनडीएला १३१ जागा होत्या आता चालू जानेवारी महिन्यात या जागा २११ ते २३१ इतक्या झाल्या आहेत. भाजपला २००९ मध्ये ११६ जागा होत्या आता मात्र या जागेचा आकडा १९२ ते २१० वर जाऊन ठेपला आहे. यूपीएला २००९ मध्ये २२८ जागा होत्या आता जानेवारीमध्ये यूपीएची घसरगुंडी झाली असून ती १०७ ते १२७ जागांवर आली आहे. काँग्रेस पक्षाला २००९ मध्ये २०६ जागा होत्या आता त्या ९२ ते १०८ वर आला आहे.
कोळसा घोटाळा, राष्ट्रकुल घोटाळा, टू जी घोटाळा, बोकाळलेला भ्रष्टाचार एवढे कमी की काय मंत्र्यांचे व्यक्तिगत घोटाळे आणि त्यात भरातभर म्हणजे महागाईची. त्यामुळं वैतागलेल्या मतदारानं यूपीए सरकारला ‘चले जाव’चा नारा दिलाय. दक्षिण भारत वगळता अर्ध्याहून अधिक जनतेनं यूपीए सरकारावर नाराज असून ‘हात’ दाखवलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.