काश्मीरप्रश्नी पंतप्रधान मोदींनी मानले काँग्रेसचे आभार

सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्ष काँग्रेसचे आभार मानले आहेत, काश्मीर खोऱ्यात सुरु असलेल्या हिंसक विरोधावर पहिल्यांदाच  नरेंद्र मोदी बोलले.

Updated: Aug 9, 2016, 09:11 PM IST
काश्मीरप्रश्नी पंतप्रधान मोदींनी मानले काँग्रेसचे आभार title=

नवी दिल्ली : सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्ष काँग्रेसचे आभार मानले आहेत, काश्मीर खोऱ्यात सुरु असलेल्या हिंसक विरोधावर पहिल्यांदाच  नरेंद्र मोदी बोलले.

नरेद्र मोदी एका जाहीर सभेत बोलताना म्हणाले, 'काश्मीरमधली परिस्थिती हाताळताना सर्वांनीच समजूतदारपणा, परिपक्वता दाखवली यासाठी मी काँग्रेसचेही आभार मानतो.'
 
मध्यप्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यात सभेमध्ये बोलताना मोदी म्हणाले, ज्या मुलांनी हातात लॅपटॉप, क्रिकेट बॅट पकडली पाहिजे त्या हातात आज भिरकावण्यासाठी दगड आहेत. प्रत्येक भारतीयाचे काश्मीवर प्रेम आहे.  प्रत्येक भारतीयाला जे स्वातंत्र्य आहे तेच स्वातंत्र्य काश्मीरमधल्या प्रत्येक नागरीकाला आहे. देशातील अन्य भागातील मुलांसारखेच आम्हाला काश्मीरमधल्या युवकांचे उत्तम भविष्य हवे आहे.
 
विकासाच्या माध्यमातून आम्ही काश्मीरमधल्या सर्व समस्यांवर तोडगा शोधत आहोत असे पंतप्रधानांनी सांगितले. काश्मीरी जनतेला उत्कर्षासाठी जी मदत हवी आहे ती केंद्र सरकार करेल. आम्हाला जम्मू-काश्मीरचा विकास हवा आहे. तो विकास महबूबी मुफ्ती यांच्या नेतृत्वाखाली होवो किंवा केंद्र सरकारच्या, असंही मोदी म्हणाले.