निवडणूक निकालानंतर मोदी सरकारचं थीम साँग प्रसिद्ध

पाच राज्यांमधल्या निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यापैकी आसाममध्ये पहिल्यांदाच भाजपची सत्ता आलेली आहे.

Updated: May 20, 2016, 06:50 PM IST
निवडणूक निकालानंतर मोदी सरकारचं थीम साँग प्रसिद्ध title=

नवी दिल्ली: पाच राज्यांमधल्या निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यापैकी आसाममध्ये पहिल्यांदाच भाजपची सत्ता आलेली आहे. तर इतर राज्यांमध्येही भाजपची मतांची टक्केवारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. केंद्रामध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारलाही दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. 

या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थीम साँग प्रसिद्ध केलं आहे. मोदींनी ट्विटरवर हे थीम साँग शेअर केलं आहे. मेरा देश बढ रहा है, आगे बढ रहा है, असं हे गाणं आहे. ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हा हॅश टॅग वापरून मोदींनी हे गाणं शेअर केलं आहे. 

हे थीम साँग सध्या ऑडिओ फॉरमॅटमध्ये उपलब्ध आहे. पण थोड्याच दिवसामध्ये या गाण्याचा व्हिडिओही प्रसिद्ध करण्यात येईल. दोन वर्ष पूर्ण केल्याबद्दल मोदी सरकारचे वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमामध्ये हे गाणं वाजवण्यात येणार आहे.