झारखंडचे पहिले गैर आदिवासी मुख्यमंत्री होणार रघुवर दास

झारखंडमध्ये स्पष्ट बहुमतात आलेल्या भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत रघुवर दास यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित झालंय. रघुवर दास हे झारखंडचे नवे मुख्यमंत्री असतील. 

Updated: Dec 26, 2014, 12:45 PM IST
झारखंडचे पहिले गैर आदिवासी मुख्यमंत्री होणार रघुवर दास title=
रघुवर दास (डावीकडे) आणि माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा (उजवीकडे)

रांची : झारखंडमध्ये स्पष्ट बहुमतात आलेल्या भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत रघुवर दास यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित झालंय. रघुवर दास हे झारखंडचे नवे मुख्यमंत्री असतील. 

रघुवर दास हे झारखंडचे पहिले आदिवासी नसलेले मुख्यमंत्री ठरलेत... या अगोदरचे झारखंडचे सगळे मुख्यमंत्री आदिवासी आहेत. 

झारखंडची ही दहावी विधानसभा असेल तर भाजपचं सरकार पाचव्यांदा इथं शपथग्रहण करणार आहे. 

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ८१ सदस्यीय सदनात भाजपा आणि आजसूनं ४२ जागांवर ताबा मिळवत बहुमत सिद्ध केलंय.  

शुक्रवारी झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री म्हणून रघुवर दास यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या बैठकीसाठी जे. पी. नड्डा, विनय सहस्त्रबुद्धे यांच्यासहीत माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा हेदेखील या बैठकीसाठी उपस्थित होते.

 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.