गुवाहाटी : अरूणाचल प्रदेश येथील सोनितपूर तसंच बतचिपूर भागावर करण्यात आलेल्या एनडीएफबी अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात निरपराध ३७ जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये, बहूतेक आदिवासींचा समावेश आहे.
आसाम आणि अरूणाचल प्रदेश राज्यांच्या सीमेवर हा हल्ला करण्यात आला. सोनितपूर येथे २४ तर बतचिपूर येथे ६ नागरिकांना एनडीएफबी अतिरेक्यांनी टार्गेट केलं. त्यानंतर या अतिरेक्यांनी कोकराझार जिल्ह्यात आणखी ४ लोकांवर गोळीबार करत ठार केलं. ‘नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँड’ (एनडीएफबी) अतिरेक्यांच्या या हल्ल्यांनंतर संपूर्ण आसाम आणि अरूणाचल प्रदेशमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, बराचशा भागात अनिश्चित काळापूरता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
सोनितपूर भागात आर्मीला पाचारण करण्यात आलं असून, गृहमंत्री राजनाथ सिंह आज घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीं यांनी या भ्याड हल्ल्याची निंदा करत हा ‘भ्याड हल्ला’ असल्याचं म्हटलंय. यासंबंधी आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगी आणि केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांच्याशीही चर्चा केली असल्याची माहिती मोदींनी सोशल वेबसाईट ट्विटरवर दिलीय.
I spoke to Assam CM Shri Tarun Gogoi & Home Minister Rajnath ji. Rajnath ji will travel to Assam and take stock of the situation.— Narendra Modi (@narendramodi) December 23, 2014
Killing of innocent people in Sonitpur & Kokrajhar is an act of cowardice. Our thoughts & prayers are with the families of the deceased.— Narendra Modi (@narendramodi) December 23, 2014
I strongly condemn the killing of tribals in Assam by NDFB militants. Killing innocent people for any cause can never be justified.— Rajnath Singh (@BJPRajnathSingh) December 23, 2014
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.