अंडर गारमेंटस्, फुटकी भांडी आणि फाटलेल्या बॅगांचं 'दान'!

'देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे' विंदा करंदीकर यांची ही कविता केवळ कविताच राहते की काय असं वाटावं आणि प्रत्येक भारतीयानं मान खाली घालावी अशी एक घटना उघडकीस आलीय.

Updated: Sep 22, 2015, 02:27 PM IST
अंडर गारमेंटस्, फुटकी भांडी आणि फाटलेल्या बॅगांचं 'दान'! title=

मुंबई : 'देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे' विंदा करंदीकर यांची ही कविता केवळ कविताच राहते की काय असं वाटावं आणि प्रत्येक भारतीयानं मान खाली घालावी अशी एक घटना उघडकीस आलीय.

'देण्याची' परंपरा असलेल्या देशात एका एनजीओला हादरवून टाकणाऱ्या अनुभवाला सामोरं जावं लागतंय, हे दुर्दैव... 'गुंज' या सामाजिक संघटनेला गरिबांमध्ये वाटण्यासाठी लोकांनी 'दान' म्हणून दिलेल्या गोष्टींमध्ये फाटलेले गारमेंटस, रक्ताचे डाग लागलेले कपडे, वापरू शकणार नाही अशी काही भांडी, फाटलेल्या बॅगा अशा काही गोष्टी 'दात्यां'नी दिल्यात. 


सौ. 'गुंज' फेसबुक अकाऊंट

हे पाहून कुणाही संवेदनशीनल व्यक्तीचा संताप अनावर होईल. 'हे काही कचरा फेकण्याचा डब्बा नाही...' असं म्हणत गुंजनं सोशल वेबसाईटच्या मदतीनं या धक्कादायक प्रकाराला वाचा फोडलीय.


सौ. 'गुंज' फेसबुक अकाऊंट

तसंच यानंतर 'दान' म्हणून दिल्या जाणाऱ्या वस्तूंवर दात्याचं नाव आणि संपर्काची माहिती दिली असेल तरच त्या स्वीकारल्या जातील, अशी भूमिकाच या संस्थेनं घेतलीय.   


सौ. 'गुंज' फेसबुक अकाऊंट

दिल्ली स्थित 'गुंज' ही स्वयंसेवी संस्था गरीबांना तसंच आपत्तीग्रस्तांना सहाय्य करण्याचं काम करते. या संस्थेचे संस्थापक अंशु गुप्ता यांना नुकतंच प्रतिष्ठित असा रॅमन मॅगसेसे पुरस्कार देऊन गौरविण्यात आलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.