www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
लोकसभेत अनेक खासदारांनी आपल्या मातृभाषेत शपथ घेतली. सुषमा स्वराज, उमा भारती यांनी संस्कृतमधून तर महाराष्ट्रातील काही खासदारांनी मराठीतून शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदीतून शपथ घेतली. आता मोदी हे परदेशी नेत्यांशी हिंदीतूनच बोलणार आहेत. त्यासाठी ते इंग्रजी दुभाषिकाची मदत घेणार आहे.
मोदी हे परदेशी नेत्यांशी बोलताना दुभाषिक (इंटरप्रेटर)ची मदत घेतील, असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. या वृत्तानुसार मोदींनी परदेशी पाहुणे, नेते यांच्याशी हिंदीतून बोलण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती महिंद्रा राजपक्षे यांच्याशी मोदींनी हिंदीतून संभाषण केले. राजपक्षे यांनी मोदींशी इंग्रजीतून संवाद साधला. यावेळी मोदींना काहीही अडचण जाणवली नाही. त्यांना दुभाषिकाची गरज लागली नाही. त्यांनी हिंदीतून उत्तरे दिलीत. यावेळी राजपक्षे यांना दुभाषिकांने समजविले. ओमानचे सुल्तान विशेषदूत यांच्यासाठी हेच प्रोटोकॉल वापरले. तसेच जे लोक हिंदीमिश्रित उर्दू बोलत होते त्यांच्याशी काहीही प्रश्न आला नाही. यामध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ, अफगानिस्ताचे राष्ट्रपती हामिद करजई यांच्याशी बोलताना मोदींना दुभाषिकाची गरज भासली नाही.
याआधी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हेही शक्यतो हिंदीतूनच संवाद साधत असत. द्विपक्षीय वार्ता करताना वाजपेयी हिंदीचाच वापर करीत असत. तर माजी पंतप्रधान चंद्रशेखर हेही हिंदीचाच वापर करत. मात्र, ते द्विपक्षीय चर्चा करताना इंग्रजीचा वापर करत. मात्र, मोदींनी हिंदीचाच पर्याय निवडला तर ते पहिलेच पंतप्रधान ठरतील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.