रेल्वेमंत्री बन्सल राजीनामा देणार नाहीत

लाचखोरी प्रकरणी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल राजीनामा देणार नाहीत. कॉग्रेसच्या कोअऱ ग्रुपच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधानांच्या निवासस्थानी 7 रेसकोर्सवर ही बैठक झाली.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 5, 2013, 11:57 PM IST

www.24taas.com,
लाचखोरी प्रकरणी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल राजीनामा देणार नाहीत. कॉग्रेसच्या कोअऱ ग्रुपच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधानांच्या निवासस्थानी 7 रेसकोर्सवर ही बैठक झाली.
कायदामंत्री अश्विनीकुमार हे सुद्धा राजीनामा देणार नाहीत. प्रकरण न्यायप्रवीष्ट असल्यानं राजीनाम्याचा प्रश्नच नसल्याचं काँग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी यांनी म्हटलंय. पूर्ण चौकशी होईपर्यंत निर्णय घेणे योग्य ठरणार नाही, असं तिवारी यांनी म्हटलंय. रेल्वेमंत्री आणि कायदामंत्री यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांचा वाढता दबाव यामुळे कॉंग्रेसच्या गोटात विचारमंथन झालं.

प्रमोशनसाठी रेल्वे बोर्डाचा सदस्य महेशकुमारकडून 90 लाखांची लाच घेणारा बन्सल यांचा भाचा विजय सिंगला आणि अमित बन्सल यांच्यामुळे बन्सल यांच्या अडचणी वाढल्यायत. या प्रकरणी आज आणखी एका आरोपीला अटक झालीय. अटक झालेल्यांची एकूण संख्या 9 झालीये.