भारतात नास्तिक लोकांची संख्या घ्या जाणून

२०११च्या जनगणनेनुसार भारतातील नास्तिकांची संख्या ३३ हजार इतकी आहे. जनगणनेनुसार नास्तिकांमध्ये शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागातील रहिवाशांची संख्या अधिक आहे. 

Updated: Jul 31, 2016, 03:02 PM IST
भारतात नास्तिक लोकांची संख्या घ्या जाणून title=

नवी दिल्ली : २०११च्या जनगणनेनुसार भारतातील नास्तिकांची संख्या ३३ हजार इतकी आहे. जनगणनेनुसार नास्तिकांमध्ये शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागातील रहिवाशांची संख्या अधिक आहे. 

ग्रामीण भागात नास्तिकांची संख्या २२ हजार ८२८ इतकी आहे तर शहरी भागात नास्तिकांची संख्या १० हजार ४७६ इतकी आहे.

यामध्ये महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक ९५२ लोक नास्तिक आहेत. तर त्यापाठोपाठ मेघालय(९०८९) आणि केरळ(४,८९६) चा नंबर लागतो. 

राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये नास्तिकांची संख्या ५४१ इतकी आहे. जनगणना २०११नुसार देशाची लोकसंख्या एक अब्ज २० करोड आहे.