प्रियकराला ते संबंध संपवायचे होते, रागाच्या भरात केली तिघांची हत्या

पती  बाहेर गावी गेल्यानंतर फोन करुन प्रियकराला पत्नी बोलवायची. पत्नीचे शेजारी राहणाऱ्या २३ वर्षीय प्रविण भट्ट यांच्याशी अनैतिक संबंध होते. मात्र, अशा संबंधाना प्रविण कंटाळला होता. त्यांने संबंध ठेवण्यास नकार दिला. यातून दोघांचे कडक्याचे भांडण झाले. रागाच्याभरात प्रविणने टोकाचे पाऊल उचलत तिघांना कायमचे संपविले. याप्रकरणी प्रविणला पोलिसांनी अटक केलेय.

PTI | Updated: Aug 19, 2015, 08:23 PM IST
प्रियकराला ते संबंध संपवायचे होते, रागाच्या भरात केली तिघांची हत्या title=

बेळगाव : पती  बाहेर गावी गेल्यानंतर फोन करुन प्रियकराला पत्नी बोलवायची. पत्नीचे शेजारी राहणाऱ्या २३ वर्षीय प्रविण भट्ट यांच्याशी अनैतिक संबंध होते. मात्र, अशा संबंधाना प्रविण कंटाळला होता. त्यांने संबंध ठेवण्यास नकार दिला. यातून दोघांचे कडक्याचे भांडण झाले. रागाच्याभरात प्रविणने टोकाचे पाऊल उचलत तिघांना कायमचे संपविले. याप्रकरणी प्रविणला पोलिसांनी अटक केलेय.

प्रविण याने रिना मालगती (३७), तिचा मुलगा आदित्य (१२) आणि साहित्या (५) यांची हत्या केली होती. रिनाचे प्रविणवर प्रेम होते. प्रविण हा सीए अभ्यासक्रमाचा विद्यार्थी. तो तिच्या घराशेजारी राहायचा. वर्षभरापासून प्रविणसोबत रिनाचे संबंध होते. पती परगावी गेला की, रिना फोन करुन त्याला घरी बोलावून घेत होती.

रिना सोबतचे अनैतिक संबंध प्रविणला संपवायचे होते. परंतु याला रिना तयार नव्हती. तिने नकार दिला. रिनाचे पती आपल्या भावासोबत गोव्याला फिरायला गेले होते. पती घरी नसल्याने रिनाने मध्यरात्री प्रविणला फोन केला. त्याला घरी बोलावून घेतले. दोघांनी गप्पा मारल्यानंत तो घरी निघून गेला. मध्यरात्री रिनाने पुन्हा प्रविणला फोन केला. तो घरी आला. यावेळी त्याने संबंध संपविण्याचे सांगितले. याला रिनाने नकार दिला. यावेळी दोघांच्यात कडाक्याचे भांडण झाले. 

चिडलेल्या प्रविणने रिनाच्या गळ्यावर धारधार शस्त्राने वार केले. यावेळी रक्तस्त्राव झाल्याने रिनाचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, भांडणाचा आवाजाने रिनाची दोन्ही मुले जागी झालीत. प्रविणने साहित्याला बाथरुममध्ये नेवून पाण्याच्या बादलीत बुडवले. तर आदित्यचा गळा दोरीने आवळला.

दरम्यान, रिनाचा १६ वर्षीय भाचा घरी आला होता. तो खेळून दमल्याने दुसऱ्या खोली झोपला होता.  त्याच्या खोलीला बाहेरु कडी घालती गेली होती. सकाळी त्याला जाग आली. मात्र, दरवाजा कोणी उघडला नसल्याने त्यांने रिनाच्या पतीला मेसेज केला. त्यानंतर रिनाच्या पतीने मेहुण्याला फोन केला. तो घरी आल्यानंतर हा प्रकार उघड झाला.

दरम्यान, रिनाचा मोबाईल गायब होता. तिने शेवटचा कॉल कोणाला केला. याची माहिती पोलिसांनी घेतली. शेवटचा कॉल हा प्रविणला असल्याचे समजताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याने चौकशीत गुन्हा कबुल केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.