'२६/११ हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता'

हेडलीनं कोर्टात दिलेल्या साक्षीनंतर पाकचा बुरखा पुन्हा एकदा फाटलाय. आपण लष्करच ए तय्यबाचा हस्तक असल्याचं डेव्हिड हेडलीनं कोर्टात कबूल केलंय. 

Updated: Feb 8, 2016, 11:51 AM IST
'२६/११ हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता' title=

नवी दिल्ली : हेडलीनं कोर्टात दिलेल्या साक्षीनंतर पाकचा बुरखा पुन्हा एकदा फाटलाय. आपण लष्कर-ए-तय्यबाचा हस्तक असल्याचं डेव्हिड हेडलीनं कोर्टात कबूल केलंय. तसंच भारतात आठ वेळा आल्याचंही त्यानं सांगितलं. 

हल्ल्याच्या आधी सात वेळा तर २६/११ हल्ल्यानंतर एकदा भारतात आल्याची कबुली त्यानं कोर्टात दिली. डेव्हीड हेडलीचं खऱं नाव सय्यद दाउद सलीम गिलानी असं होतं.

लष्करचा हस्तक साझीद मीनच्या सांगण्यानंतर त्यानं २००६ मध्ये आपलं नाव बदललं. भारतात येण्यासाठीच नाव बदललं, असं हेडलीनं कोर्टाला सांगितलंय. 

२६/११  दहशतवादी हल्ल्याप्रकरणी हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड कोलोमन हेडलीची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून साक्ष नोंदवायला सुरुवात झालीय. दुपारी १२ वाजेपर्यंत ही साक्ष चालणार आहे.