जालंधर : सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान'मुळे पाकिस्तानातील नागरिकांची मने जिंकल्याचे आपण ऐकले होते. पण सलमान खानचा हा चित्रपट पाहून त्याची एक झलक पाहण्यासाठी थेट पाकिस्तानातून भारतात विना पासपोर्ट दाखल होणाऱी एक महिलेला फॅनला पोलिसांनी अटक केली.
पाकिस्तानच्या अटारीतून दिल्लीत जाणाऱ्या समझौता एक्सप्रेस ट्रेनमध्ये या महिलेला गुरुवारी जालंधर पोलिसांनी अटक केलीय.
पासपोर्टशिवाय ही महिला समझौता एक्सप्रेसमध्ये दाखल झाली होती... आणि भारतातही दाखल झाली होती. त्यामुळे, भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यांनी तिला अटक केली.
चौकशीदरम्यान महिलेने सांगितलं की, 'बजरंगी भाईजान' म्हणजे सलमान खानला भेटण्यासाठी भारतात आली आहे. मी माझ्या मामासोबत प्रवास करत होते आणि माझा पासपोर्ट आणि व्हिजा त्यांच्याकडेच आहे, असंही तिने सांगितलं.
ही महिला कराचीला राहणारी आहे. तिचे नाव चंदा असून तिच्या पतीचे नाव सलमान खान आहे, असं पोलिसांच्या चौकशीत समोर आलंय.
चुकून समझौता एक्सप्रेस ट्रेनमध्ये चढल्याचे या महिलेने आपल्या जबाबात म्हटले आहे. अटारीमधून ही महिला रेल्वेत चढली होती, त्यामुळे सध्या तिला अटारी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.