सीमेवर सापडलं धमकीचा संदेश असलेलं कबुतर

पंजाबच्या सीमेवर पठाणकोटमध्ये धमकीचा संदेश घेऊन आलेलं कबुतर आढळलं आहे.

Updated: Oct 2, 2016, 08:52 PM IST
सीमेवर सापडलं धमकीचा संदेश असलेलं कबुतर title=

पठाणकोट : पंजाबच्या सीमेवर पठाणकोटमध्ये धमकीचा संदेश घेऊन आलेलं कबुतर आढळलं आहे. उर्दू भाषेमध्ये हा धमकीचा संदेश लिहिण्यात आला आहे. बीएसएफला संबाल पोस्टजवळ हे कबुतर आढळून आलं आहे. हे कबुतर आणि संदेश असलेला कागद बीएसएफनं पोलिसांकडे दिला आहे.