पंतप्रधान नरेंद्र मोदींची 'मन की बात'

मन की बातद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जनतेशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही 31वी मन की बात असणार आहे.

Updated: Apr 30, 2017, 10:51 AM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदींची 'मन की बात' title=

नवी दिल्ली : मन की बातद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जनतेशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही 31वी मन की बात असणार आहे.

दुर्गम भागातील जनतेशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  या उपक्रमाची सुरुवात केली. या उपक्रमाच्या माध्यमातून ते जनतेकडून सूचनाही मागवतात. दरम्यान संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची समाप्ती आणि दिल्ली महापालिकेत निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर पंतप्रधानांची ही पहिलीच मन की बात असणार आहे. त्यामुळे पंतप्रधान या कार्यक्रमात कोणते मुद्दे मांडतात याकडे सा-यांचं लक्ष लागलं आहे.