'गीता चॅम्पियन' मरिअमची पंतप्रधानांनी घेतली भेट!

धर्माच्या नावावर भेदाभेद योग्य नाही याची आपल्या ज्ञानातून आणि कृत्यातून शिकवण देणाऱ्या मुंबईच्या मरिअमची आज खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली.  

Updated: Jun 18, 2015, 07:42 PM IST
'गीता चॅम्पियन' मरिअमची पंतप्रधानांनी घेतली भेट! title=

नवी दिल्ली : धर्माच्या नावावर भेदाभेद योग्य नाही याची आपल्या ज्ञानातून आणि कृत्यातून शिकवण देणाऱ्या मुंबईच्या मरिअमची आज खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली.  

मुंबईत मीरारोडला राहणाऱ्या मरिअम आसिफ सिद्दीकी या मुलीनं इस्कॉननं आयोजित केलेल्या 'भगवद गीता चॅम्पियन लीग' या लेखी स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावला होता.   मरिअमच्या या कार्याची दखल पंतप्रधानांनीही घेतलीय. 

मरिअम सिद्दीकीने आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. त्यावेळी या चिमुरड्या गीताव्रतीचं पंतप्रधानांनी तोंडभरून कौतुक केलं. 

उल्लेखनीय म्हणजे यावेळी, मरिअमनं पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी आणि स्वच्छता अभियानासाठी प्रत्येकी 11,000 रुपये मदत म्हणूनही दिलेत.

गीता चम्पिअन्स लीग स्पर्धेत मरिअमला 100 पैकी 100 गूण मिळाले होते. गीतेमध्ये जीवनाचं सार सामावलेलं आहे, असं हिंदू धर्मीय मानतात. मात्र, गीतेचं तत्वज्ञान विशिष्ट धर्मापुरतं मर्यादित नाही, हे मरिअमनं सप्रमाण सिद्ध केलंय. मानवता हाच खरा धर्म असल्याचं ती मानते.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.