महात्मा गांधींना श्रद्धांजली देणारे पंतप्रधान शास्त्रींच्या समाधीजवळ फिरकलेही नाहीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी जयंती निमित्तानं आज राजघाटावर जाऊन 'राष्ट्रपित्या'ला श्रद्धांजली दिली. मत्र, लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीजवळ मात्र पंतप्रधान मोदी फिरकलेही नाही. यावरूनच आता पुन्हा एक वाद उभा राहिलाय. 

Updated: Oct 2, 2015, 04:23 PM IST
महात्मा गांधींना श्रद्धांजली देणारे पंतप्रधान शास्त्रींच्या समाधीजवळ फिरकलेही नाहीत title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी जयंती निमित्तानं आज राजघाटावर जाऊन 'राष्ट्रपित्या'ला श्रद्धांजली दिली. मत्र, लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीजवळ मात्र पंतप्रधान मोदी फिरकलेही नाही. यावरूनच आता पुन्हा एक वाद उभा राहिलाय. 

लाल बहादूर शास्त्री यांच्या कुटुंबीयांनी तसंच काँग्रेस नेत्यांनी यावर आपला आक्षेप नोंदवलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीचं दर्शन का घेतलं नाही, याबद्दल कोणतीही कल्पना नाही असं शास्त्री यांचा मुलगा अनिल शास्त्री यांनी म्हटलंय. 

ही पहिलीच वेळ आहे जेव्हा पंतप्रधानांनी शास्त्रीजींच्या समाधीवर जाऊन त्यांना श्रद्धांजली दिलेली नाही, असंही त्यांनी म्हटलंय. 

दरम्यान, काँग्रेस नेते अखिलेश प्रताप सिंह यांनी ट्विट करून पंतप्रधान मोदी यांनी शास्त्रींना श्रद्धांजली न वाहिल्याबद्दल प्रश्न उभे केलेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.