गांधीनगर : भारत हा जगातील सर्वात मोठी डिजिटल अर्थव्यवस्था होण्याच्या उंबरठ्यावर आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. त्याचवेळी भाजप सरकार भारतीय अर्थव्यवस्थेतील सुधारणांसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. ते मंगळवारी गुजरातमधील गांधीनगर येथील आठव्या व्हायब्रंट गुजरात परिषदेत बोलत होते.
मोदी पुढे म्हणालेत, भारत हा जागतिक अर्थव्यवस्थेतील चमकदार बिंदू बनला आहे. आगामी काळात ‘मेक इन इंडिया’ हा भारताचा सर्वात मोठा ब्रँड बनेल. यावेळी मोदी यांनी जपान आणि कॅनडा या देशांसह व्हायब्रंट गुजरात परिषदेतील सहभागी देशांचे आणि संस्थांचे आभार मानले.
Gandhinagar: PM Narendra Modi inaugurates the Coffee table book and policy documents at the 8th edition of Vibrant Gujarat Summit. pic.twitter.com/bZvYnXvwIB
— ANI (@ANI_news) January 10, 2017
महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची जन्मभूमी असणारा गुजरात भारताच्या उद्यमशीलतेचे प्रतिक आहे. लोकशाही ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे. काही लोकांना लोकशाही व्यवस्था प्रभावी आणि गतिमान नसल्याचे वाटते. मात्र, लोकशाहीतही जलद गतीने निकाल पाहायला मिळतात, हे गेल्या अडीच वर्षात दिसून आल्याचे मोदींनी सांगितले.
Over last 2 1/2 years,we've also evolved a culture of healthy competitions among states,being rated on parameters on good governance-PM Modi pic.twitter.com/a7tp9R0AJE
— ANI (@ANI_news) January 10, 2017
या परिषदेला रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी, रतन टाटा यांच्यासह उद्योगक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
Today as India approaches a new era that Mr Modi is leading, Gujarat will be one of the leading State in the country: Ratan Tata pic.twitter.com/Du0VNx7D0W
— ANI (@ANI_news) January 10, 2017