मोदींचं 'मिशन काश्मीर'; पारंपरिक पोशाखात लेहमध्ये दाखल

Updated: Aug 12, 2014, 01:41 PM IST
मोदींचं 'मिशन काश्मीर'; पारंपरिक पोशाखात लेहमध्ये दाखल title=

 

लेह : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यासाठी लेहमध्ये दाखल झालेत. सकाळी 9.30 च्या दरम्यान ते लेहमध्ये दाखल झालेत. इथल्या पोलो ग्राऊंडमध्ये मोदी थोड्याच वेळात आपल्या जाहीर भाषणाला सुरुवात करतील.

लेहमध्ये पोहचल्यानंतर मोदींचा बदललेला अंदाज पाहायला मिळाला. इथं दाखल झाल्यानंतर त्यांनी इथला पारंपरिक पोशाखही परिधान केलाय. इथं ते भारतीय सैन्याच्या जवानांचीदेखील भेट घेतील. शिवाय 349 किलोमीटर लांब लेह-श्रीनगर ट्रान्समिशन लाईनचं उद्घाटनही ते यावेळी करणार आहेत.  

मोदी आज लेह आणि कारगीलचा दौरा करणार आहेत. लडाखमध्ये मोदी हायड्रो प्रोजेक्टचं उदघाटन करणार आहेत. या दौऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पहिलं जाहिर भाषण या दौऱ्यात करणार आहेत. 

जम्मू आणि काश्मीरवासियांना मोदींकडून मोठ्या आशा आहेत. 15 ऑगस्टपूर्वी मोदी काश्मीरवासियांना दोन महत्त्वाचे संदेश देणार आहेत. एक म्हणजे दहशतवादाविरुद्ध सरकार कडक भूमिका घेणार आणि दुसरा संदेश म्हणजे काश्मीरच्या विकासासाठी सरकार अधिक प्रयत्नशील असेल. 

दरम्यान, पंतप्रधानांच्या या दौऱ्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षेचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. त्यामुळे लेह आणि कारगिलला एखाद्या छावणीचं स्वरुप प्राप्त झालंय.  

नरेंद्र मोदींचा काश्मीर दौरा कसा असणार आहे त्यावर एक नजर टाकूयात...
* हायड्रो प्रोजेक्टचं करणार उदघाटन 
* लेह पोलो ग्राऊंडवर जनतेला उद्देशून भाषण 
* लेहनंतर मोदी कारगिलला जाणार
* कारगिलमध्ये जनतेला उद्देशून भाषण
* 44 मेगावॅट वीजेच्या प्रोजेक्टचं उदघाटन

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.