नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या सरकारची महत्त्वकांक्षी ‘आदर्श ग्राम योजने’चा शुभारंभा केलाय.
पंतप्रधान मोदींनी दिल्ली स्थित विज्ञान भवनात योजनेचा शुभारंभ करताना ‘ही गोष्ट खूपच सोप्पी आहे... गरज आहे ती फक्त आपल्याला आपला अॅटीट्यूड बदलण्याची...’ असं यावेळी म्हटलंय.
कोणत्याही पक्षाचा खासदार असो, आपलं लक्ष्य केवळ विकास असायला हवा’ असं आवाहन पंतप्रधानांनी सर्वपक्षीय खासदारांना केलंय.
‘या योजनेद्वारे एका रचनात्म राजकारणाचा रस्ता खुला होईल. यो योजनेद्वारे प्रत्येक खासदार वर्ष 2019 पर्यंत तीन गावांना मुळापासून संस्थागत विकासाचा पाया उभारण्याची जबाबदारी घेईल... म्हणजेच 2019 पर्यंत प्रत्येक लोकसभा क्षेत्रात तीन आदर्श गाव बनवण्याचं लक्ष्य समोर असेल.
स्वातंत्र्य मिळवल्यानंतर आत्तापर्यंत आलेल्या प्रत्येक सरकारनं ग्रामीण विकासासाठी काही ना काही काम केलंय. पण, या प्रयत्नांमध्ये संशोधन केलं जाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे, जागतिक पातळीवर होणाऱ्या परिवर्तनानुसार आपल्याला पुढे वाटचाल करता येईल. या योजनेत 2016 पर्यंत प्रत्येक खासदार एक-एक गाव विकसीत बनवतील आणि नंतर 2019 पर्यंत दोन-दोन गावांचा विकास केला जाईल.
आम्हाला काम करायचंय, सार्वजनिक सहभागातून बदल शक्य आहे का? हेही यातून दिसे... अचानक स्थितीपालट होईल, असा दावा मी करत नाही... ही योजना काही परिपूर्ण नाही... वेळेनुसार या योजनेतही बदल आणि परिवर्तन केलं जाईल, असंही यावेळी मोदींनी म्हटलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना संसदेच्या नावाने ‘आदर्श ग्राम योजने’ची घोषणा केली होती. त्यानुसार, लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या 112 व्या जयंती दिनी सांसद आदर्श ग्राम योजनेचा प्रारंभ पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.