65 वर्षांचे झाले पंतप्रधान, #HappyBirthdayPM ट्रेंडिंग

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 65 वा वाढदिवस. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या दीर्घायुष्याच्या आणि उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्यात. एवढंच नव्हे तर ट्विटरनं आज पंतप्रधानांचा वाढदिवस खास दिवस बनवला.

Updated: Sep 17, 2015, 07:10 PM IST
65 वर्षांचे झाले पंतप्रधान, #HappyBirthdayPM ट्रेंडिंग title=

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 65 वा वाढदिवस. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या दीर्घायुष्याच्या आणि उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्यात. एवढंच नव्हे तर ट्विटरनं आज पंतप्रधानांचा वाढदिवस खास दिवस बनवला.

ट्विटरनं नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या ऑफिशिअल अकाऊंटला रंगबिरंगी फुग्यांनी सजवलं. आज ट्विटरवर 'हॅप्पी बर्थडे पीएम' हा हॅशटॅग ट्रेडिंगमध्ये नंबर वन वर आहे. 

मोदींना भाजपच्या नेत्यांशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी त्यांचे आभारही मानले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.