नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट असतांना दिल्लीत देखील हालचालींना चांगलाच वेग आला आहे. पीएम मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय स्तरावर बहिष्कार करण्याची रणनिती ठरली आहे.
बैठकीत लष्कर प्रमुख दलबीर सिंह, गृहमंत्री राजनाथ सिंह, रक्षामंत्री मनोहर पार्रिकर, अर्थमंत्री अरुण जेटली आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल हे देखील उपस्थित होते.
बैठकीत सगळ्यांचं या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचं एकमत होतं. याबाबतचे पुरावे देखील समोर आले आहेत. भारत यूएनमध्ये पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करण्याची मागणी करणार आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज संयुक्त राष्ट्र संम्मेलनाला संबोधित करणार आहेत. या वेळेसच पाकिस्तान विरोधात आवाज उठवला जाणार आहे.