रांची: झारखंडचे १०वे मुख्यमंत्री म्हणून रघुवर दास यांनी आज शपथ घेतली. खराब हवामानामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाही. पंतप्रधानांनी ट्विटरवरून झारखंडच्या नव्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.
झारखंड राज्य अस्तित्वात आल्याच्या १४ वर्षांनंतर भाजपा-ऑल झारखंड स्टुडंटस् युनियन निवडणूकपूर्व आघाडीनं ८१ सदस्यीय विधानसभेत ४२ जागांसह पूर्ण बहुमत मिळवलं आहे.
यावेळी भाजपचे तीन आमदार आणि ऑल झारखंड स्टुडंट युनियनचा एक आमदार शपथ घेतली. रांचीच्या बिरसा मुंडा फुटबॉल स्टेडियमवर हा सोहळा पार पडला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.