'बिकिनी गर्ल देऊन कर्ज फेडा'

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी मल्ल्यांना एक अनोखा सल्ला दिला आहे. राम गोपाल वर्मा यांनी म्हटलंय, 'मला वाटते विजय मल्ल्या यांनी आपल्या वैयक्तिक बँकेतून त्यांच्या कर्जदार बँकाना प्रत्येकी एक बिकिनीतील सौंदर्यवती द्यावी आणि कर्ज चुकते करून टाकावे'. 

Updated: Mar 13, 2016, 07:07 PM IST
'बिकिनी गर्ल देऊन कर्ज फेडा' title=

मुंबई : दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी मल्ल्यांना एक अनोखा सल्ला दिला आहे. राम गोपाल वर्मा यांनी म्हटलंय, 'मला वाटते विजय मल्ल्या यांनी आपल्या वैयक्तिक बँकेतून त्यांच्या कर्जदार बँकाना प्रत्येकी एक बिकिनीतील सौंदर्यवती द्यावी आणि कर्ज चुकते करून टाकावे'. 

'बिकिनी गर्लचा प्रस्ताव कदाचित बँका मान्य करणार नाहीत, मात्र बँकर्स हा प्रस्ताव आनंदाने मान्य करतील', असे म्हणत, रामूने दिवसभरात मल्ल्यांना असभ्य भाषेत सल्ले देणारे सहा ट्विट केले.

दीपिका पदुकोन, नर्गिस फाखरी, ईशा गुप्ता, कतरीना कैफ यांसारख्या मल्ल्यांच्या कॅलेंडर गर्ल्सनी बँकर्सना प्रभावित केले असावे, असे म्हणायलाही रामू विसरले नाहीत.

मल्ल्या यांनी बँकांकडून कर्ज घेऊन कमावलेली बिकिनी गर्ल्सची संपत्ती यापूर्वीच बँकर्सकडे सुरक्षा ठेव म्हणून ठेवली असावी. त्यामुळेच बँका तक्रार करण्यास पुढे येत नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे.